फुलंब्री, (प्रतिनिधी): गेल्या महिनाभरापासून बोधेगाव आणि परिसरात उपद्रव सुरू आहे. त्यातच शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याने पुन्हा एका वासराचा फडशा पाडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बोधेगाव येथील शेतकरी दामू यादव बावस्कर यांच्या मालकीच्या शेतात वन्य प्राणी बिबट्याने हल्ला करून त्यांचा एक (गोरा) वासरु ठार केला. रात्री साडे नऊ वाजेच्या दरम्यान शेतवस्तीवर राहणाऱ्या बावस्कर कुटूंब जेवण करीत असतांना अचानक बिबट्याने घरासमोर सहान जात बांधलेल्या गुरातून एका वासरावर हल्ला चढवीत शेजारील मकाच्या पिकात फरटत नेले.
वानीहर त्यांनी आरडाओरड करीत शेजाऱ्यांना मदतीसाठी लाठ्या-काठ्या घेऊन वासराच शोध घेतल्यावर बोलावले. एकदम दहा पंधरा जणांनी हातात ते मकाच्या वावरात मृत अवस्थेत आढळून आले. दुसऱ्या दिवशी वन विभागाचे कर्मचारी वनरक्षक अजीम शेख, विजय कुंटे, व वनसेवक जिंदराज जोगदंडे यांनी पंचनामा केला आहे.











